Home क्राईम मोटरसायकल व क्रूझरचा भीषण अपघात ; नवविवाहित तरुणाचा जागीच मृत्यू

मोटरसायकल व क्रूझरचा भीषण अपघात ; नवविवाहित तरुणाचा जागीच मृत्यू

0
183


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल-चोपडा राज्य महामार्गावरील साकळी गावाजवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दुचाकी आणि चारचाकी क्रूझर यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहित रविंद्र कुवर (वय अंदाजे २५), रा. धनगरवाडा, यावल हा आपल्या दुचाकी (क्र. MH 19 X 1744) वरून यावलच्या दिशेने जात होता. दरम्यान, दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास साकळी गावाजवळील भारत टोलकाटक्‍यानजीक सुनिल प्रविण पाटील (रा. किनगाव, ता. यावल) यांच्या ताब्यातील क्रूझर वाहन (क्र. MH 19 BU 2129) व मोहितच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की मोहित कुवर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार वाहनांच्या वेगाचा अंदाज व चुकीच्या बाजूने चालविल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मोहित कुवर यांचा मृत्यू ही कुटुंबासाठी फार मोठी शोकांतिका ठरली आहे. तो आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. विशेष म्हणजे अवघ्या चार महिन्यांपूर्वीच त्याचे विवाह झाले होते. अशा वयात आणि अशा दुर्दैवी अपघातामुळे झालेल्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावात शोककळा पसरली आहे.


Protected Content

Play sound