चोपडा प्रतिनिधी । विना अनुदानीत तत्त्वावर काम करणा-या शिक्षकांचे मुंबई येथे उपोषण सुरु असतांना झालेल्या लाठीमारबाबत
येथील म्युन्सिपल हायस्कुलमध्ये दि. 28 ऑगस्ट रोजी निषेध सभा घेण्यात आली असून कलाध्यापक संघाचे अध्यक्ष दिनेश बाविस्कर यांच्यावतीने तहसिलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, सभेत शिक्षक नेते आर.एच.बाविस्कर, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मंगेश भोईटे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पाटील, कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या वतीने प्रा.संदिप पाटील, विनाअनुदानित कृती समितीचे अध्यक्ष प्रा. अजहर शेख, कलाध्यापक संघाचे अध्यक्ष दिनेश बाविस्कर यांनी आपली भुमिका मांडली. त्यांनी तहसिलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले.
याचबरोबर तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर संघ, खाजगी प्राथमिक संघटना, कनिष्ठ महाविद्यालयीन संघ, शिक्षक भारती संघटना, कलाध्यापक संघ, क्रीडा शिक्षक महासंघ, माध्यमिक शिक्षक सेना, काँग्रेस शिक्षक संघ, राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल, विना अनुदानित कृती समिती, अपंग कर्मचारी संघटना इत्यादी संघटनातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी पी.एस.पाटील, कैलास महाजन, संजय सोनवणे, देवेंन्द्र पाटील, संजय पाटील, एस.पी.बाविस्कर, जगदीश जाधव, अनिल वाघ, अशोक साळुंखे, फारुख पटेल, व्ही.आर.पाटील, ए.एल.चव्हाण, अतुल बडगुजर, एस.आर.महाजन, विकास शिर्के, अभिजित देशमुख, एस.डी.चौधरी, डी.व्ही.पवार, पी.ए.महाजन, संजय बारी, रविंद्र वाडे, कुंदन भोसले, दिपिका पाटील, शेख प्रवीण, सैय्यद तबस्सुम, अर्जुन कोळी, प्रविण पाटील, व्ही.डी.शिंदे, दिपक करंकाळ, अजय सैंदाणे, पी.सी.पाटील, माने, निकम, नगरे, राकेश महाजन, मयुरेश्वर सोनवणे, आर.टी.सोनवणे, राठोड, अशोक सुर्यवंशी, भरत पाटील, नरेंद्र पाटील, प्रविण पाटील, नंदलाल वाघ, जितेंद्र महाजन, धमेंद्र पाटील, दिवाकर बाविस्कर, सौरभ कुलकर्णी, भुषण पाटील, सौरभ जैन, यु.बी.धनगर, जयेश पाटील, निवृत्ती पाटील, पी.आर.माळी, व्ही.ए.पाटील, एस.टी.शिंदे, प्रा.शैलेश पाटील तसेच तालुक्यातील प्रत्येक शाळेचे प्रतिनिधी हजर होते.