Home क्राईम भरधाव चारचाकीने दुचाकीला उडविले : दोन सख्खे भाऊ जागीच ठार !

भरधाव चारचाकीने दुचाकीला उडविले : दोन सख्खे भाऊ जागीच ठार !

0
289

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन सख्खा भावांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना तालुक्यातील वर्डी फाटा ते वडती फाट्याच्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर घडली.

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर वर्डी फाटा ते वडती फाटा दरम्यान चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील स्वार मगन जगन बारेला (२५) व रगन जगन बारेला (१८) हे दोघे सख्खे भाऊ जागीच ठार झाले.

सोमवार दिनांक ८ रोजी संध्याकाळी ५ वाजेचा सुमारास अडावद चोपडा दरम्यान वडती फाट्याजवळ अडावदकडून चोपडाकडे जाणारी एम.एच.०४ एच. एफ. ८२९६ चार चाकीने समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या झालेल्या भिषण अपघातात दुचाकीवरील स्वार मगन जगन बारेला (२५) व रगन जगन बारेला (१८) रा. वर्डी ता. चोपडा हे दोन्ही सख्खे भाऊ जागीच ठार झाले.

अपघात झाल्यानंतर तात्काळ अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळ गाठले. वाहतूक सुरळीत केली. चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील प्रशांत पाटील (मामू) यांनी दोघांना रुग्णवाहिकेत टाकले. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ. पवन पाटील यांनी दोघांना मृत घोषीत केले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. पवन पाटील यांनी शविच्छेदन केले.

याबाबत चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्हा तेथून शून्य क्रमांकाने अडावद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


Protected Content

Play sound