नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने आता शेतकर्यांना थेट मदत देण्याचे जाहीर केले असून याच्या अंतर्गत शेतकर्यांना सहा हजार रूपये त्यांच्या खात्यात मिळणार आहेत.
प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणांचा समावेश असेल असे मानले जात होते. या अनुषंगाने त्यांनी किसान सन्मान योजनेची घोषणा केली. याच्या अंतर्गत दोन हेक्टरपर्यंत जमीन असणार्या शेतकर्यांना दर वर्षी सहा हजार रूपयांची मदत मिळणार आहे. ही मदत शेतकर्यांना त्यांच्या थेट खात्यामध्ये मदत मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी १ डिसेंबर २०१८ पासून करण्यात येणार असल्याची घोषणादेखील पियुष गोयल यांनी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील लहान शेतकर्यांना दरमहा ५०० रूपये मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.