बुलढाण्यातील सर्व सहा जागेवर शेतकरी उमेदवार देणार – रविकांत तुपकर

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा लोकसभा मतदार संघातून शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण त्यांना मिळालेली मते दुर्लक्षित करून चालणार नाहीत. त्यांना सिंधखेड राजा मतदार संघातून आघाडी मिळाली होती. तर मेहकर विधानसभेतून बरोबरीची मते मिळाली होती. त्यामुळे पराभव झाला असला तरी तुपकरांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याच जोरावर आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. बुलढाणा लोकसभेतील सहाही विधानसभा मतदार संघात शेतकरी संघटना उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहेत.

बुलढाणा लोकसभेच्या पराभवानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर विधानसभा लढणार असल्याचे जवळपास निश्चित आहेत. १३ किंवा १४ जुलै रोजी राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची सोबत चर्चा करून राज्यात विधानसभा निवडणुका लढणार असल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे. बुलढाणा येथील तुपकर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक बोलवली होती. त्यावेळी त्यांनी बुलढाण्यातील सहाही विधानसभा मतदार संघातून लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या निर्णयामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार की महाविकास आघाडीची याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. सध्या बुलढाणा लोकसभा मतदार संघात महायुतीचे सर्व आमदार आहेत.

रविकात तुपकर यांनी बुलढाणा लोकसभेतून निवडणूक लढवली. यात तुपकर यांना सिंधखेडराजा या विधानसभा मतदार संघातून जवळपास 29 हजार 989 मतांचे लीड मिळाले होते. त्यामुळे तुपकरांना आता विधानसभेत जाण्याचे वेध लागले आहेत. तर या मतदार संघा शिवाय मेहकर मतदार संघातूनही तुपकर यांना शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या बरोबरीने मते मिळाली होती. इथे ते फक्त 200 मतांनी पिछाडीवर होते. इतर चार मतदार संघातही तुपकरांना चांगली मते मिळाली होती. त्यामुळे विधानसभेत मुसंडी मारण्याची रणनिती त्यांनी आता आखली आहे. बुलढाणा, मेहकर, चिखली, सिंदखेडराजा,जळगाव जामोद आणि खामगाव या विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो.

Protected Content