Home Cities भडगाव वडजी सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा एल्गार; वीजप्रश्नी ‘महावितरण’ विरोधात ठिय्या!

वडजी सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा एल्गार; वीजप्रश्नी ‘महावितरण’ विरोधात ठिय्या!


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऐन पिकांच्या हंगामात महावितरणच्या लहरी कारभारामुळे भडगाव तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. वडजी ३३/११ केव्ही उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांमधील कृषीपंपांना सलग आणि सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याने, सोमवारी सकाळी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सबस्टेशनवर धडक देत ठिय्या आंदोलन केले.

शेतकऱ्यांचा संताप आणि मागणी:
गेल्या अनेक दिवसांपासून वडजी, महिंदळे, नालबंदी, पांढरद आणि पिचर्डे परिसरातील शेतकरी वीज कपातीमुळे त्रस्त आहेत. दिवसा वीज मिळत नसल्याने रात्री-अपरात्री पिकांना पाणी द्यावे लागते, त्यातच सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. “आम्हाला सलग आणि दिवसा वीज मिळावी,” या मागणीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी उपकेंद्राचा परिसर गजबजून टाकला होता.

आमदारांचा काॅल…अन् अधिकार्यांना धरले धारेवर
दरम्यान शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांना भ्रमणध्वनीवरून आंदोलनाबाबत माहीती दिली. त्यांनी शेतकर्याच्या भूमिकेला सहमती दर्शवत सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री आडतेकर यांना सलग दिवसा वीजपुरवठा का सुरू होत नाही? असा सवाल करत चांगलेच धारेवर धरले. याप्रसंगी शेतकर्यांनी पुर्वी आठ तास मिळणारी वीज तास तासावर आणल्याचे सांगीतले. त्यावर पूर्ववत आठ तास वीज देण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील, ‘उबाठा’ शिवशक्ती -भीमशक्ती चे तालुकाप्रमुख राजेंद्र मोरे, वडजीचे उपसरपंच भाऊसाहेब परदेशी, पिचर्डेचे माजी उपसरपंच विनोद बोरसे, प्रदिप पाटील, युवासेनचे तालुकाप्रमुख जगदीश पाटील, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय पाटील, वडजीचे माजी उपसरपंच स्वदेश पाटील, समाधान पाटील, बापुजी पाटील, शेतकरी सेनेचे उप तालुकाप्रमुख संभाजी पाटील, पिचर्डे माजी उपसरपंच सोनू महाजन, राजेंद्र पाटील, सतिश पाटील, पळासखेडेचे सरपंच अमृत पाटील, तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष विजय पाटील, दिपक पाटील, पपेशराव पाटील, डाॅ.दिपक परदेशी, रावसाहेब पाटील, विलास पाटील, भुषण येवले, पाढंरथ चे सरपंच समाधान पाटील, सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, धनराज पाटील, भागवत पाटील, नंदकिशोर पाटील,नालबंदिचे गंगाराम राठोड, भगवान निकम,शुभम परदेशी, रोहीत पाटील , धीरज सोनवणे, कुणाल पाटील, प्रदिप पाटील, गणेश पाटील, जयपाल परदेशी, जितेंद्र पाटील, स्वप्निल पाटील आदि शेकडो शेतकरी उपस्थीत होते.


Protected Content

Play sound