शेतकर्‍यांना तातडीने भरपाई मिळावी (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करतांना उच्च दाबाच्या वाहिन्यांसाठी नशिराबाद येथील शेतकर्‍यांची जमीन वापरण्यात आली असून याचा मोबदला अद्याप मिळालेली नाही. या शेतकर्‍यांना तातडीने मोबदला मिळावी या मागणीसाठी आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, मौजे नशिराबाद येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम करीत असताना नशिराबाद-बोदवड रस्ता बायपास करण्यासाठी उडाणपुलचे काम खुरु असल्याचे ठिकाणी त्या उडाणपुलाला अतिउच्चदाब विज वाहिनी ही क्रॉस होत आहे. या उड्डाणपुलचे काम झाल्यानंतर वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्याच्या दुष्टीने ही विज वाहिनी तात्रिकदृष्टया उंच व स्थलातरकरण्याचे कार्य सुरु आहे. परतु, विज वाहिनी स्थलांतरित करतांना ठेकेदार शासन निर्णयांचे उल्लंघन करून शेतकऱ्याकांडून ना-हरकत प्रमाणपत्र बनवून दिले आहेत. वास्तविक शासन निर्णयाच्या मुदा के ३१ नुसार जिल्हाधिकारी स्तरावरुन समिती स्थापन करून सदर समितीने अतिउच्चदाब मनोऱ्याव्याप्त व वाहिनोच्या तारेखालील जमिनीची मोजणी करुन प्रस्तावाप्रमाणे मूल्यांकन करुन मोबदला निश्चित करावा असे स्पष्ट निर्देश शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहेत.

अतिउच्चदाबाच्या मनोऱ्याचे व विज वाहिनीचे स्थलांतर करतांना संदर्भीय शासन निर्णयानुसार प्रकिया राबविण्यात यावी असे निर्देश संबंधित विभागाना देण्यात यावे. जेणेकरुन सबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळू शकेल. सदर विज वाहिनी स्थलांतचे काम प्रत्यक्षात सुरु असल्याने माझ्या पत्राची लवकर दखल घेण्यात यावीत अशी मागणी जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी केली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/975846649598675

Protected Content