यावल प्रतिनिधी । यावल शहरासह तालुक्यातील तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांना संगणकीकृत डिजीटल सातबारा उतारा वितरण करण्यात येत आहे. महसूल विभागाने सुरू केलेल्या वाटप मोहिमेला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना मोफत संगणकीकृत स्वाक्षरीकृत उतारे वितरणाची मोहीम फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. यावलचे तहसीलदार महेश पवार, यावल शहर मंडळ अधिकारी शेखर तडवी, शहर तलाठी ईश्वर कोळी, टाकरखेडा सजाचे तलाठी यु. यु. बाभुळकर, परसाडे सजा तलाठी समीर तडवी, निमगाव तलाठी, नावरे सजाचे मारूळे, संदीप गोसावी, कोरपावली सजाचे तलाठी मुकेश तायडे यांच्यासह तालुक्यातील विविध तलाठी कार्यालयांवर स्वातंत्राच्या अमृत महोत्सवासवी वर्षाच्या निमित्ताने महसूल प्रशासनाच्या सुरू करण्यात आलेल्या मोफत उतारे वितरणास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात नुकतीच यावलच्या चावडीवरील तलाठी कार्यालयात यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी, शहर तलाठी ईश्वर कोळी, टाकरखेड्याचे तलाठी यु . यु . बाभुळकर, शेतकरी तथा प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी मनोज करनकर आदी शेतकरी बांधवांना यावेळी मोफत डिजीटल स्वाक्षरीकृत उतारे वितरीत करण्यात आले .