जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गारखेडा या छोट्याशा गावातील माजी पोलीस पाटील तथा शेतकरी प्रकाश पाटील यांची मुलगी प्रिया प्रकाश पाटील हिने एमपीएससी परिक्षेत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) बनली आहे. तिच्या यशामुळे गावकऱ्यांनी घोड्यावर बसवून शाही थाटात मिरवणूक काढण्यात आला. यावेळी जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
प्रिया प्रकाश पाटील हिने लोकसेवा आयोग परीक्षा पास करून पोलीस उपनिरीक्षक बनली असून गावातील ती पहिलीच महिला पोलीस उपनिरीक्षक बनल्याचा मान मिळवला आहे. यामुळे गारखेडा ग्रामस्थांनी डीजे तालावर वाजवत घोड्यावर साई थाटाने भव्य अशी मिरवणूक गावातून काढून तिचा नागरी सत्कार नगराध्यक्ष साधना महाजन व जिल्हा परिषद जळगाव अधीक्षक अभियंता प्रशांत पाटील यांच्याहस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रिया पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, मुलांनी प्रयत्न करावे, भविष्यात यशस्वी व्हाल, माझी सुद्धा परिस्थिती नसताना मी वेळोवेळी अभ्यास केला व माझ्या आई-वडिलांनी मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी लोकसेवा परीक्षा पास झाली आहे. आज पोलीस उपनिरीक्षक प्रिया पाटील बनली असून मी लोकांमध्ये राहून जनतेची सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. यावेळी प्रिया पाटील व आई-वडिलांचे अनंत पाहायला मिळाले.