Home राजकीय शेतकऱ्यांची मुलं लावारिस : भाजप प्रवक्ते अवधूत वाघांबद्दल संतापाची लाट

शेतकऱ्यांची मुलं लावारिस : भाजप प्रवक्ते अवधूत वाघांबद्दल संतापाची लाट


Wagh
 

मुंबई (वृत्तसंस्था) शेतकऱ्यांची मुले म्हणजे लावारिस असतात, असे संतापजनक ट्वीट भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटविरोधात सोशल मीडियात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या एका ट्वीटला उत्तर देताना वाघ यांनी हे ट्वीट केले आहे.

शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता. या ट्वीटला वाघ यांनी ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात, असे ट्वीट केले आहे. ज्यामुळे सध्या चौफेर संताप व्यक्त केला जात आहे. अवधूत वाघ यांनी याआधीही बेताल वक्तव्यं केली आहेत. मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार आहेत, असे भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटले होते. भाजपने वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना कोणत्याही माध्यमांशी बोलण्यास बंदी देखील घातली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound