धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिंदे गटाच्या आमदारांनी प्रत्येकी ५० कोटी घेतल्याचा आरोप आता राज्याच्या अक्षरश: कान्याकोपर्यात पोहचला असून आमदारांच्या पाठोपाठ मंत्र्यांनाही याचा मनस्ताप होत असल्याचे दिसून येत आहे. आज असाच प्रकार मंत्री दादा भुसे यांच्यासोबत घडला.
यात शिंदे गटातील सदस्य आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे आज धुळे जिल्ह्याचा दौर्यावर असताना त्यांना शेतकर्यांच्या रोषाला बळी पडावे लागल्याचे दिसून आले. शेतकर्यांनी त्यांची अक्षरश: खिल्ली उडविली. भुसे हे साक्री तालुक्यातील कासारे गावात उद्घाटन करत असताना शेतकर्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. इतकेच नव्हे तर पन्नास खोके मंत्री ओके अशा जोरजोरात घोषणा देत मंत्री भुसे यांचा निषेध करण्यात आला. दरम्यान, दादा भुसे यांनी शांतपणे घोषणा देणार्यांना जवळ बोलावून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते देखील अक्षरश: हतप्रभ झाल्याचे दिसून आले. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार थांबला. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यावरून याच्या बाजूने आणि विरोधात जोरदार चर्वण सुरू झाले आहे