Home राजकीय शेतकरी नेते रविकांत तुपकर १८ जानेवारीला रावेरमध्ये ; कृषिसेवक पुरस्काराने शेतकरी बांधवांचा...

शेतकरी नेते रविकांत तुपकर १८ जानेवारीला रावेरमध्ये ; कृषिसेवक पुरस्काराने शेतकरी बांधवांचा सन्मान


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकरी, शेती आणि ग्रामीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा सन्मान करण्यासाठी रावेर येथे भव्य राज्यस्तरीय कृषिसेवक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. साप्ताहिक कृषिसेवकच्या वर्धापन दिनानिमित्त १८ जानेवारी रोजी रावेर येथे ८ व्या कृषिसेवक पुरस्कार वितरण समारंभात शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा गौरव करण्यात येणार आहे.

हा सन्मान सोहळा कै. श्रीमती शेनाबाई गोंडू पंडीत मराठा समाज मंगल कार्यालयात सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. राज्यभरातील प्रगतिशील शेतकरी, कृषी क्षेत्रात योगदान देणारे कार्यकर्ते आणि विविध संस्थांशी संबंधित मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार असून, शेतकरी चळवळीला प्रेरणा देणारा हा कार्यक्रम ठरणार आहे.

साप्ताहिक कृषिसेवकच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव, महालक्ष्मी बायोजिनिक्स चिनावल, गोदावरी फाउंडेशन जळगाव, माऊली फाउंडेशन आणि भारती ज्वेलर्स रावेर हे प्रमुख प्रायोजक आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण पाटील उपस्थित राहणार असून, उद्घाटन आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते होणार आहे.

या सोहळ्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असून, पुरस्कारार्थींच्या कार्याचा सविस्तर आढावा घेणाऱ्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. या विशेषांकातून पुरस्कारप्राप्त शेतकरी आणि कृषीसेवकांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती मांडण्यात येणार आहे.

कार्यक्रमास कृषी व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये कृष्णात महामुलकर, प्रदीप कोठावदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, विनोद तराळ, के. बी. पाटील, अनिल भोकरे, सुरेश धनके, जे. के. पाटील, रंजना पाटील, संगीता महाजन, नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील, डॉ. प्रशांत सरोदे, श्रीराम पाटील, योगीराज पाटील, राहुल पंडीत, डॉ. संदीप पाटील, पद्माकर महाजन, भारती गणवानी, विशाल जयस्वाल, भाऊसाहेब वाळके, सोपान पाटील, महेश महाजन, राहुल पाटील, युगंधर पवार, सी. एस. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत.

या राज्यस्तरीय कृषिसेवक पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून शेती क्षेत्रातील योगदानाची दखल घेतली जाणार असून, शेतकरी बांधवांना नवी प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळणार आहे. रावेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यासाठी हा कार्यक्रम अभिमानास्पद ठरणार असल्याचे चित्र आहे.


Protected Content

Play sound