
मुंबई (वृत्तसंस्था) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (मंगळवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही.
हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना दारुण पराभव झाला आहे. शिवसेनेचे नवखे उमेदवार धैर्यशील माने यांनी त्यांच्यावर लाखाहून अधिक मताने मात केली. माने यांची मराठा जात आणि त्यावरून केलेला बहुजन समाजाच्या अस्मितेचा मुद्दा यामुळे माने यांची बाजू भक्कम झाली होती. याचा फायदा त्यांना निवडणुकीतही झाला. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र मनसेच्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट करण्यात आले आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.