प्रशिक्षणार्थी तहसीलदार मयुर कळसे यांना निरोप

रावेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यात महसुली कामकाज करत असताना सहकारी अधिकारी उत्कृष्ट असतील तर कुठेही अडचण येत नाही. प्रशिक्षणार्थी तहसीलदार मयुर कळसे यांची उणीव भासणार असल्याचे तहसीलदार बंडू कापसे यांनी सेंडऑफ कार्यक्रमात सांगितले.

रावेर तहसील कार्यालयातील अप्पर तहसीलदार व अन्य कर्मचाऱ्यांची बदली झाल्यामुळे त्यांना कार्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. या प्रसंगी तहसीलदार बंडू कापसे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थितांमध्ये नायब तहसीलदार संजय तायडे, आर. डी. पाटील, किशोर पवार, मंडळाधिकारी यासिन तडवी, शेलकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश पाटील, दीपक नगरे, शालिक महाजन, प्रवीण पाटील, इंद्रजित भारंबे, संजय राठोड, शरीफ तडवी, स्वप्नील परदेशी, ओमप्रकाश मटाले, सचिन पाटील, अनंत खवले, अजित तोंगळे, पुरवठा निरीक्षक श्रीमती सरोदे, गोपाळ भगत, सुषमा घरडे कांबळे, श्रीमती बर्वे, काजोल पाटील, रश्मी शिंदे, पल्लवी पाटील, श्रीमती कोळी, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळाधिकारी विठोबा पाटील यांनी केले.

तहसीलदार मयुर कळसे म्हणाले की, अप्पर तहसीलदार म्हणून काम करत असताना खूप काही शिकायला मिळाले. सहा महिन्यांसाठी आलो होतो, परंतु येथे 22 महिने निघाले. या दरम्यान तत्कालीन तहसीलदार उषारानी देवगुणे, तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या सोबत काम करतांना मला खूप शिकायला मिळाल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Protected Content