Home क्राईम डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयात लाडक्या बाप्पाला निरोप 

डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयात लाडक्या बाप्पाला निरोप 

0
243


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन महाविद्यालयात गणेशोत्सवाच्या अंतिम दिवशी लाडक्या बाप्पाला जल्लोषात निरोप देण्यात आला. सकाळपासूनच महाविद्यालयाचा परिसर भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. ढोल-ताशांचा गजर, जयघोष, गुलालाची उधळण आणि विद्यार्थिनींचा उत्साह यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीला विशेष रंगत आणली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी गणपतीच्या महापूजेनं झाली. पूजन श्री. मुरलीधर वायकोळे यांनी पत्नीसमवेत पार पाडलं. पूजेनंतर होम-हवन देखील करण्यात आले. या धार्मिक विधींनी संपूर्ण वातावरण पवित्रतेने भारून गेलं. महाविद्यालयात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील आणि प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांची उपस्थिती होती.

महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी मोठ्या उत्साहात पारंपरिक वेशात सजून बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करत भव्य मिरवणूक काढली. ही मिरवणूक एम.आय.डी.सी. परिसरातून सुरू होऊन गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत नेत बाप्पाला साग्रसंगीत निरोप देण्यात आला. मिरवणुकीदरम्यान गुलालाची उधळण, बाप्पा मोरया च्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता.

या विसर्जन सोहळ्याला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थिनींमध्ये धार्मिक भावना व उत्साह जागृत झाल्याचं चित्र दिसून आलं.


Protected Content

Play sound