Home धर्म-समाज ‘विरावली’त पोस्टमास्टर आसाराम पाटील यांचा निरोप समारंभ संपन्न

‘विरावली’त पोस्टमास्टर आसाराम पाटील यांचा निरोप समारंभ संपन्न

0
92

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील ‘विरावली’ गावाचे पोस्टमास्टर आसाराम पाटील यांच्या सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमात सरपंच व मान्यवर तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

पोस्ट विभागाच्या ‘विरावली’ या गावातील पोस्ट ऑफीस कार्यालयात आपले सेवाकार्य पूर्ण झालेल्या आसाराम निळकंठ पाटील यांचा सेवानिवृत्तीपर त्यांच्या निवासस्थानी एका छोटेखानी निरोप समारंभ संपन्न झाला.

यावेळी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचेचे सभापती तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख आणि तुषार पाटील यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी विरावली माजी सरपंच ईश्वर पाटील, विद्यमान सरपंच कलिमा तडवी, महबूब तडवी, उपसरपंच मानिषा पाटील, विरावली गावाचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य नामदेव अडकमोल, राजेंद्र पाटील, नसीर तडवी, संदीप पाटील, पुंडलिक पाटील, इब्राहिम तडवी, ग्रामपंचायत सदस्य, विरावली गावातील ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound