भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ प्रतिनिधी । प्राणघातक हल्ल्यातील फरार आरोपीला बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने फैजपूर येथून शिताफीने अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, जळगाव येथील औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात दिनांक १७.०५.२०१९ रोजी भाग ५ गुरक्र ४०९/२०१९ भादंवि कलम- ३०७,३४ तसेच भाग ५ गुरक्र ४०८/२०१९ भादंवि कलम -३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. यातील फिर्यादी किरण शंकर खरचे (रा.सुप्रीम कॉलनी जळगाव) यास यातील आरोपीने चाकूने खून करण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी लोमेश उर्फ निलेश युवराज सपकाळे (वय-२६ रा आसोदा रोड जळगाव) हा फरार झालेला होता. त्याचा पोलीसांतर्फे तपास सुरू होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना निलेश सपकाळेबाबत गुप्त माहिती मिळाली. यानुसार त्याला फैजपूर येथील सोसायटी वाईनच्या जवळून अटक करण्यात आली. सपकाळेकडे त्याने गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर कारदेखील जप्त करण्यात आली. यानंतर संबंधीत आरोपीस एमआयडीसी पोलसी स्थानकाचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी, पो. ना. रविन्द्र बिर्हाडे, रमण सुरळकर, विकास सातदिवे व ईश्वर भालेराव यांच्या पथकाने केली.