चोपडा (प्रतिधिनी)। येथील वृंदावन प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध एफएम रेडिओ आरजे व अस्मिता वाहिनीवरील निवेदिका अनघा मोडक (मुंबई) यांचे ‘जीवनातील संघर्ष पेलतांना’ या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यानाचे १६ मार्च शनिवार रोजी सायंकाळी ६ वाजता पंकज बालसंस्कार केंद्र, यावल रोड येथे आयोजन करण्यात आले आहे.
अनघा मोडक यांनी आकाशवाणीसाठी पद्मश्री पं. तुळसीदास बोरकर, पं. सुरेश तळवळकर, पं. ह्रदयनाथ मंगेशकर इ. मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासह १५ पेक्षा अधिक प्रतिष्ठीत पुरस्कार मिळालेले आहेत. त्या स्वत: ऐन तारुण्यात डेंगू आजारात दृष्टी गमावूनही ‘तुझ्या जीवनाची तूच उद्धारिणी’ या उक्तिला जागून स्वानुभव सांगत इतरांना प्रेरणा देण्यासाठी व्याख्यान देत महाराष्ट्राभर फिरत आहेत. हा व्याख्यानाचा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. तरी युवकयुवती, विशेषतः स्त्रियांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे नरेंद्र विसपुते यांनी केलेले आहे.