जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा महिला व बाल रुग्णालय (मोहाडी) येथे नुकतेच दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ११० रुग्णांच्या कुटुंब नियोजनाच्या अत्यंत जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या.
डॉ. बेलसोडे आणि त्यांच्या टीमने या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या शस्त्रक्रियाNormal Delivery (४१), पहिल्या सिजेरियन सेक्शन (१६), दुसऱ्या सिजेरियन सेक्शन (५३) अशा अत्यंत गुंतागुंतीच्या व जोखमीच्या होत्या.
रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ. रूपाली कळसकर, डॉ. मीना दामोदरे आणि सहायक अधिसेविका संगीता शिंगारे, शस्त्रक्रिया विभाग प्रमुख, कक्ष प्रमुख, अधिपरिचारिका, कक्ष सेवक व इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धापटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग पवार यांच्या सहकार्याने हे संपूर्ण शिबिर यशस्वीपणे पार पडले.