Home क्राईम ट्रॅक्टरच्या धक्क्यावरून राडा; कुटुंबाला बेदम मारहाण!

ट्रॅक्टरच्या धक्क्यावरून राडा; कुटुंबाला बेदम मारहाण!


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ट्रॅक्टरने घराच्या भिंतीला धडक दिल्याच्या किरकोळ कारणावरून जामनेर शहरात दोन गटांत भीषण हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका कुटुंबाला घरासमोर येऊन लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली असून, घराची तोडफोड आणि दगडफेक केल्याप्रकरणी गुरूवारी २६ मार्च रोजी रात्री १० वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील मदन नगर येथे आयशाबी शेख अनिस यांच्या घराच्या भिंतीला २४ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका धडक दिली होती. या कारणावरून संशयित आरोपी शहबाज खान युनूस खान याने आयशाबी व त्यांचे पती अनिस शेख बिस्मिल्ला खान यांना मारहाण करून शिवीगाळ केली. हा वाद तिथेच न थांबता पुन्हा रात्री ८ वाजता रात्री ८:१५ च्या सुमारास अधिक विकोपाला गेला.

रात्रीच्या वेळी संशयित आरोपी युनूस खान हनिफ खान, शहबाज खान युनूस खान, आरबाज खान, आझर खान, आफसर खान आणि फैजान खान शब्बीर खान यांच्यासह इतर ५ ते ६ जणांच्या जमावाने हातात लाठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीच्या घरासमोर धिंगाणा घातला. महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून अनिस शेख आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली. इतकेच नव्हे तर घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून आणि छताचे नुकसान करून परिसरात मोठी दहशत निर्माण केली.

या प्रकरणी आयशाबी शेख अनिस (वय ५०, रा. मदनी नगर, जामनेर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बाळू भोई हे करीत आहे.


Protected Content

Play sound