Home क्राईम उसनवारीचे पैसे मागितल्याने कुटुंबावर जीवघेणा हल्ला !

उसनवारीचे पैसे मागितल्याने कुटुंबावर जीवघेणा हल्ला !


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसनवारीने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी महिलेचा हात फ्रॅक्चर झाला असून, याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पनाबाई दिलीप पाटील (वय ५८, रा. नगरदेवळा ता. पाचोरा) यांनी उसनवारीने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून गावात राहणारे संशयित आरोपी तीश परमेश्वर पाटील, आकाश सतीश पाटील, तेजस सतीश पाटील आणि बेबाबाई सतीश पाटील यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ही घटना ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता घडली. या घटनेत कल्पनाबाई पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच पैसे देणार नाही, जे काय करायचे आहे ते करू घ्या अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ हरीशकुमार अहिरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound