रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील पाल येथे एक संशयीत इसम स्वत: जवळ गावठी पिस्टल घेवून मध्य प्रदेश राज्यातून पाल गावातुन महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याची खात्री लायक गोपनीय माहिती रावेर पोलिसांना प्राप्त झाली होती.
मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे, रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत पाल ते खरगोन रस्त्यावरील विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदी येथे जावून पोलिसांचे पथक कार्यवाही करत होते. २६ ऑक्टोबर रोजी रात्रीच तात्काळ पाल येथे रवाना होवून शेरी नाका येथील नाकबंदी येथे थांबलो असतांना रात्री 03.50 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे पेहराव केलेला इसम गावठी देशी बनावटीचे पिस्तुल विनापरवाना बेकायदेशीर रित्या त्याच्या कब्जात बाळगतांना मिळुन आला.
सदर इसमास ताब्यात घेवून त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी बनावटीच्या १ रिव्हाल्वर 10,000/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यावरुन नामे भरत गणेश सोनवणे (वय 32 वर्ष रा.वडोदा ता यावल जि जळगांव) यास ताब्यात घेवुन त्यास रावेर पोलीस स्टेशन वेथे पुढील कार्यवाही कामो घेवून आलो पोकों/समाधान कौतीक ठाकुर यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरन 502/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3.25 प्रमाणे सहकलम मुंबई पोलीस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लघन कलम 135 प्रमाणे दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदशनाखाली पोउनि तुषार पाटील हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक जळगांव, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक तुपार पाटील, पोहेको संजय मेढे (चालक), पोकों/समाधान ठाकुर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, पोकों विकार शेख, यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.