बनावट फेसबुक अकाऊंटवरून पैश्यांची मागणी; सायबर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तरूणाच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तरूणाच्या मित्रांसह नातेवाईकांना खरे फेसबुक अकाऊट भासवून फोन-पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून पैश्यांची मागणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की,  निलेश तुकाराम पाटील रा. गणेश कॉलनी, भुसावळ जि.जळगाव हे खासगी नोकरी आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. १८ ते १९ मे दरम्यान निलेश पाटील यांच्या नावे अज्ञात व्यक्तीने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. त्यावर निलेश पाटील यांचा फोटो लावून आकाऊंट सुरू केले. निलेश पाटील यांच्या नावे तयार केलेले बनावट अकाऊंटवरून निलेश पाटील यांच्या मित्रांसह नातेवाईकांना खरे भासवून त्यांच्याकडून पैश्यांची मागणी केल्याचे समोर आले आहे. ही रक्कम फोन-पे किवा पेटीएमच्या माध्यमातून मागत असल्याचे दिसून आले. आपल्या नावे बनावट खाते तयार करून इतरांची फसवणूक होत असल्याची माहिती निलेश पाटील यांना समजली. त्यांनी तत्काळ जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात रितसर अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. निलेश पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.

Protected Content