Home Cities यावल फैजपूर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी रशीद तडवी बिनविरोध

फैजपूर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी रशीद तडवी बिनविरोध

faizpur nivad samiti
faizpur nivad samiti

faizpur nivad samiti

फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रशीद नसीर तडवी यांची बिनविरोध निवड घोषित करण्यातआली उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नयना चौधरी यांनी माघार घेतल्याने रशीद तडवी यांची बिनविरोध निवड झाली हि घोषणा यावल चे तहसिलदार व निवडणूक पिठासन अधिकारी जितेंद्र कुवर यांनी ही घोषणा केली. आज फैजपूर पालिकेच्या सभागृहात सदरची बैठक दुपारी 12 वाजता घेण्यात आली होती.

उपनगराध्यक्ष पदासाठी रशीद तडवी व नयना चंद्रशेखर चौधरी यांचा प्रत्येकी एक एक अर्ज दाखल करण्यात आला होता. ऐनवेळी नयना चौधरी यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक रशिद तडवी यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगराध्यक्षा महानंदा टेकाम होले उपस्थित होते. सदर बैठकीला भाजप गटनेते मिलिंद वाघुळदे, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, काँग्रेस गटनेते कलीम मणियार, नगरसेवक हेमराज चौधरी, देवेंद्र बेंडाळे, प्रभाकर सपकाळे, अमोल निंबाळे, देवेंद्र साळी, अमिता चौधरी, नयना चौधरी, शकुंतला भारंबे, पुष्पा कापडे, वत्सला कुंभार, शेख नासिफ बी इरफान, मलक साहिमा बी आबिद, मोमीन फातेमा बानो रईस, शाहीन परवीन शकील खान, हे उपस्थित होत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound