फैजपूर प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने फैजपूर येथे सातवर्षांपूर्वी प्रांत कार्यालय मंजूर केले असून कार्यालय फैजपुरात नगरपरिषदेच्या जागेत सुरु आहे. सदरचे प्रांतकार्यालय सावदा येथे जाण्याच्या हालचाली सुरु आहे. प्रांत कार्यालय फैजपूरातून सावदा येथे स्थलांतरीत होऊ नये, या मागणीसाठी शनिवारी २ रोजी सर्वपक्षीय निवेदन फैजपूर प्रांत डॉ.अजित थोरबोले यांना देण्यात आले आहे.
रावेर, यावल या दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी फैजपुर हे मध्यवर्ती ठिकाण असून प्रांतकार्यालय शहाराच्या बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे. या कार्यालयामुळे यावल-रावेर तालुक्यात शैक्षणिकदृष्टया शिक्षणाचे माहेरघर असलेल्या फैजपूर शहरात रावेर-यावल तालुक्यातील जवळपास 5 हजार विदयार्थी शिक्षण घेत आहे. तसेच न्यायालयीन कामकाजासाठी व विविध प्रकारचे दाखले, विविध समस्या मांडण्यासाठी, विविध निवेदन शासन दरबारी देणेसाठी फैजपूर उपविभागीय कार्यालय शहरात असल्यामुळे नागरिकांच्या अडचणी त्वरीत सोडविण्यात येतात. दरम्यान, फैजपुर येथील उपविभागीय कार्यालयासाठी शहरात तूर्तास नगरपरिषदेची जागा असल्याने बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही. फैजपूर शहर हे दोन्ही तालुक्याच्या दृष्टीकोनातून सर्व वर्गाला उपयोगी शहर आहे. मध्यवर्ती ठिकाण असून सोयी सुविधा उपलब्ध आहेत, प्रवासी मार्ग सोयीस्कर आहे आणि शैक्षणिक दृष्ट्यापण योग्य आहे. विज,पाणी,राहणे सर्व दृष्ठीकोनातून फैजपूर शहर संपन्न आहे.
आणखी जागा हवी असेल तर नगरपरिषद पहिल्या मजल्यावरील आणखी काही खोल्या देण्यास तयार आहे. त्या उपरही दुसरी जागा हवी असेल तर खालील जागांचे पर्याय शहरात झालेल्या बैठकीतून जनता सुचवत असून त्यातून काहीतरी मार्ग काढता येईल. तरी सद्धा जागेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला फैजपूर शहरातील नागरिक, पदाधिकारी, पत्रकार, निवेदनावर नगराध्यक्ष महानंदा होले, प्रभारी नगराध्यक्ष रशीद नसीर तडवी,शेख रियाज अध्यक्ष फैजपूर कॉग्रेस, संजय पंडित अध्यक्ष फैजपूर भाजपा, अमोल निबाळे अध्यक्ष फैजपूर शिवसेना, शेख अन्वर खाटिक अध्यक्ष फैजपूर राष्ट्रवादी, केतन किरंगे माजी उपनगराध्यक्ष,हेमराज चौधरी माजी उपनगराध्यक्ष तथा जिल्हा दूध संघ संचालक, मनोज कापडे वंचित आघाडी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, यांच्यासह व्यापारी, पत्रकार व पंचक्रोशीतील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
प्रभारी नगराध्यक्ष रशीद तडवी, नगरसेवक हेमराज चौधरी, नरेंद्र नारखेडे, रवींद्र होले, भाजपा अध्यक्ष संजय रल, चंद्रशेखर चौधरी, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, फैजपूर काँग्रेस अध्यक्ष रियाज शेख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अन्वर खाटीक, नगरसेवक देवेंद्र साळी, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, वंचित आघाडीचे मनोज कापडे, सैय्यद कौसर, रघुनाथ कुंभार, माजी नगरसेवक मेहबूब पिंजारी, अशोक भालेराव, शेख इरफान,जितेंद्र भारंबे आदी उपस्थित होते.