Home राष्ट्रीय लडाखमधील अपयशामुळे जिनपिंग यांच्या भविष्याला धोका !

लडाखमधील अपयशामुळे जिनपिंग यांच्या भविष्याला धोका !

0
35


 

वॉशिंग्टन वृत्तसंस्था । कम्युनिस्ट पार्टीच्या स्वच्छतेसाठी मोहीम सुरू करून चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अगोदरच अनेकांचे शत्रुत्व ओढवून घेतले आहे. त्यातच भारताचा भूभाग असलेल्या लडाखमध्ये घुसखोरी करण्याच्या योजनेचे सूत्रधार खुद्द जिनपिंग आहेत. भारतीय लष्कराने पीपल्स लिबरेशन आर्मीला दणका दिल्याने लडाखमध्ये चीन अपयशी ठरला आहे. या अपयशामुळे जिनपिंग यांचे भवितव्य धोक्यात आले आहे, असा दावा अमेरिकेतील न्यूजवीक या साप्ताहिकाने केला आहे.

भारतीय सीमेवर आलेल्या अपयशाचे गंभीर परिणाम परिणाम जिनपिंग यांना भोगावे लागणार आहेत. लष्करात असलेले सरकारविरोधी अधिकारी बदलून निष्ठावंतांना नियुक्ती देण्यासाठी जिनपिंग यांना अवधी देण्यात आलेला आहे. जिनपिंग लष्कराच्या मध्यवर्ती आयोगाचे तसेच पक्षाचे अध्यक्ष आहेत. अशा स्थितीत आक‘मक चिनी लष्कर लडाखमध्ये अपयशी ठरले. त्यामुळे ते भारतावर मोठा हल्ला करण्याची शक्यता या लेखात वर्तवण्यात आली. मे महिन्याच्या सुरुवातीला चिनी लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दक्षिणेकडून घुसखोरी केली. येथे सीमांकन झालेले नाही. त्यामुळे चिनी लष्कर या भागात कित्येक वर्षांपासून घुसखोरीचा प्रयत्न करीत आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये जिनपिंग यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारल्यापासून हा प्रकार वाढला आहे. गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसक संघर्षात चीनचे 43 सैनिक मारले गेले, असा अंदाज वर्तवला जात असला, तरी प्रत्यक्षात 60 पेक्षा जास्त जवान ठार झाले आहेत, असा दावा फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमॉक्रसीचे स्लीओ पास्कल यांनी केला.


Protected Content

Play sound