फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुका विधी सेवा समिती व मुन्सिपल हायस्कूल फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त महिलांचे कायदेविषयक शिबीर व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी यावल न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एस बनचरे होते. व्यासपीठावर न्यायाधीश व्ही.एस.डांबरे, प्रांताधिकारी कैलास कडलग, बिडीओ मंजूश्री गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर, अधिकारी सुरेश धनके, नईम खान, पी.एस.आय. मोहन लोखंडे, प्रवीण सपकाळे, मुख्याध्यापक के.टी.तळेले, पर्यवेक्षक संजय सराफ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता पूजनाने करण्यात आली.
दरम्यान, फेसबुकवर ओळख नसताना महिलेस वारंवार रिक्वेस्ट पाठवणे व ती न स्वीकारल्यास कायद्याने गुन्हा आहे. महिलांनी स्वतःवर अत्याचार झाल्यास वाचा फोडा. महिलांनी अन्याय अत्याचार सहन करू नये. पुरुषांपेक्षा महिला कमी नाही. महिलांनी अभ्यास करून शिक्षित व्हावे. क्षमतेचा वापर करावा व कायद्याची माहिती व्हावी असे महिला दिनी न्यायाधीश व्ही एस डांबरे यांनी मनोगत व्यक्त केले.
न्यायमूर्ती एम एस बनचरे यांनी मुलींचे प्रमाण कमी असून ते वाढणे गरजेचे आहे. लग्न करताना हुंडा देऊ नका हुंडा घेऊ नका. गर्भ लिंग निदान कायद्याने गुन्हा असे आव्हान केले.
प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क व ऑनलाईन मतदार नोंदणी फॉर्म कसा भरावा त्यात चूक होता कामा नये. 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवा याविषयी मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
एडवोकेट नितीन चौधरी, ऍड किशोर सोनवणे, एडवोकेट खालिद शेख, ऍड सुरडकर, एडवोकेट देवेंद्र बाविस्कर, अडवोकेट एन पी मोरे, ऍड अजय कुलकर्णी, ऍड कवडीवाले, पीएलव्ही शशिकांत वारूळ कर, हेमंत फेगडे, अजय बढे, नंदकिशोर अग्रवाल, दिपाली झोपे, पोलीस कॉन्स्टेबल अमजद खान पठाण, रवींद्र मोरे, बाळू भाई, होमगार्ड सुनील क्षत्रिय, बी डी महाले, व्ही एस महाजन, व्हि. ओ चौधरी, शाळेचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका नीलिमा खडके, आभार होली मॅडम यांनी केले. वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.