Home Cities जळगाव डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण कार्यशाळा

डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण कार्यशाळा


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जळगाव (खु.) येथे “डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत : प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण” या विषयावर संकरीत (ऑनलाईन व ऑफलाईन) पद्धतीने निरंतर वैद्यकीय शिक्षण (सीएमई) कार्यशाळेचे आयोजन रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.

रेडिओलॉजी विभागाच्या वतीने आयोजित या शैक्षणिक कार्यशाळेला सकाळी १० वाजता डॉ. केतकी पाटील हॉल, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव (खु.) येथे प्रारंभ होणार आहे. या कार्यशाळेत प्रसूतीपूर्व काळातील अल्ट्रासाऊंड तपासण्यांचे महत्त्व, त्यातील तांत्रिक बारकावे तसेच प्रत्यक्ष वापरास उपयुक्त ठरणारी प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.

कार्यशाळेदरम्यान पहिला ट्रायमिस्टर स्कॅन, एनटी व एनबी स्कॅन, प्रसूती डॉपलरची भूमिका, एएनसीमध्ये मातृत्व मृत्यू रोखण्यात रेडिओलॉजीचे योगदान, एनटी स्कॅन कसा करावा, अ‍ॅनोमली स्कॅन करतानाच्या युक्त्या तसेच ऑब्स्टेट्रिक डॉपलर प्रत्यक्ष करताना घ्यावयाच्या काळजीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. या सत्रांमध्ये प्रत्यक्ष डेमोंस्ट्रेशनद्वारे सहभागी डॉक्टरांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात येणार आहे.

या कार्यशाळेसाठी डॉ. रुचिता बागडी, डॉ. किरण पाटील, डॉ. अंजली भिरूड, डॉ. वैशाली चौधरी तसेच डॉ. राजकिरण राठी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. लोककल्याणकारी दृष्टिकोनातून सहभागी डॉक्टरांना २ एमएमसी क्रेडिट पॉइंट्सही प्रदान करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध असून ३ फेब्रुवारीपासून तसेच स्पॉट नोंदणीही करता येणार आहे. नोंदणीसाठी इच्छुकांनी https://godavarifoundation.com/CPI/cme.html या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी डॉ. राजकिरण राठी (मो. ७५८८८१०२२२) किंवा डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी (मो. ९८४८०८६८७४) यांच्याशी संपर्क साधावा.


Protected Content

Play sound