वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगाव येथे सतत धार पावसाने व्यवस्थापनाजवळ व घराजवळ सातत्याने दोन्ही पक्षांच्या नागरिकांनी रास्ता रोको केला आहे.याबाबत निवेदनात म्हटले आहे की वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर पासून येणाऱ्या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद केल्याने सदरचे हे पाणी भंगाळे मेडिकल जवळ तसेच भोईटे हॉस्पिटलच्या आसपास तुंबलेले होते. सदरचे पाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांना व्यवस्थापनास अडचण होऊ लागली होती. या रस्त्यावर दवाखाने, दुकान, मेडिकल स्टोअर्स, राष्ट्रीयकृत बँका असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी नागरीकांनी सांगितले कि आम्हाला कोणाच्या बांधकांमा बाबत तक्रार करायची नसून फक्त पाणी तुंबायला नको अशी कारवाई करावी.
याप्रकरणी नागरिकांनी बस स्टँड जवळ रस्ता रोको करून नगरपरिषदेच्या अधिकारी सूर्यवंशी व वरणगावचे सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना निवेदन दिले असून तरी हा प्रवाह पूर्ववत सुरू करावा अशी मागणी केली आहे. निवेदनावर विजय भंगाळे, प्रदीप भंगाळे, पराग पाटील, हरिभाऊ पाटील, नितीन कापूरे, डॉ .नीतू पाटील, विनोद झोपे व इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याच वेळी येथील व्यवसायिक गोल्डी आनंद व लव आनंद यांनी ही आंदोलन केले व आम्ही नियमानुसार बांधकाम करून कोणताही नैसर्गिक प्रवाह रोखला नाही असे सांगितले. मंगळवारी ३० जुलै रोजी बाजाराच्या दिवशी समोरा समोर आंदोलन झाल्याने बघणाऱ्यांनी गर्दी केली होती. या प्रसंगी नगरपालिकेच्या अधिकारी पंकज सुर्यवंशी यांनी सांगितले की उद्या मुख्याधिकारी येणार असून नियमाप्रमाणे व सामोपचाराने मार्ग काढून ही समस्या दूर केली जाईल असे सांगितले.