मरावे परी नेत्ररूपी उरावे; चौधरी दाम्पत्याचा एकुलत्या मुलाच्या अकाली मृत्यूनंतर नेत्रदानाचा निर्णय !

अमळनेर ईश्‍वर महाजन । येथील मनीष संजय चौधरी याचे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अकाली निधन झाल्यानंतर त्याच्या पालकांनी नेत्रदानाचा निर्णय घेत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

अमळनेर परिसरात सुख,दुःख असो लग्न असो वा उत्तर कार्य असो आपली व्यक्तिगत कामे सोडून ते समाजकार्यात हजेरी लावतात एक आदर्श व्यक्तिमत्व संजय चौधरी उर्फ रावसाहेब यांचा एकुलता एक मुलगा मनीष चौधरी काल अचानक देवा घरी गेल्याची घटना माहित पडताच अमळनेर तालुक्यातील सर्व मित्र परिवार राजकीय ,सामाजिक लोकांनी उपस्थित राहून दुःख व्यक्त केले. मनीषच्या सुखदुःख मध्ये आई-वडील यांनी जन्मापासून तर आजतागायत सेवा केली. मनीष लहानपणापासूनच खूपच हुशार होता संगणकाचे चांगले ज्ञान होते. परंतु शेवटी म्हणतात ना हुशार मुलं देवाला प्रिय असतात असंच मनीष बाबत घडलेली घटना सगळ्यांना चटका देणारी आहे. एकुलता एक मुलगा जाण्याचे दु:ख चौधरी दाम्पत्याला सहन करावे लागले आहे. मात्र मुलाच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून सावरून त्यांनी मनीषचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.

मनिष याने गत वर्षी दहावीत ६९% गुण मिळवून त्याने आपली चमक दाखवली होती. तो अमळनेर अयोध्यानगर येथील सौ प्रतिभा व श्री संजय निंबा चौधरी (चिरणे) यांचा एकुलता एक मुलगा व कळमसरे येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य रमेश चिंधा चौधरी यांचा नातू होता. आपल्या मुलाचे कायम स्मरण व्हावे व हे जग पुन्हा पहावे म्हणून चौधरी कुटुंबियांनी नेत्रदानाच्या घेतलेल्या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Add Comment

Protected Content