जळगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगांव येथील केंद्र सरकार संचलित जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी च्या सन 2021-22 प्रवेशाकरीता होणाऱ्या निवड चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 29 डिसेंबरपर्यंत तर इयत्ता नववसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
सबंधीतांनी नियोजीत 10% वाढीव नोंदणी 29 डिसेंबर, 2020 पर्यत पुर्ण होईल, असे नियोजन करावे. तसेच दिनांक 30 ते 31 डिसेंबर, 2020 या कालावधीत त्रुटी पुर्ततेसाठी त्याच वेबसाईटवर उपलब्धता राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
याबाबतची सुचना सर्व पालक, शिक्षक, केंद्रप्रमुख, विसतार अधिकारी व सर्व सबंधीतांनी जिल्ह्यातील इयत्ता 5 वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांस द्यावी व सहकार्य करावे. असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी केले आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी/पालकांनी/शिक्षकांनी वेबसाईटवरुन माहिती पत्रकात उपलब्ध असलेले मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र डाऊनलेाड करुन भरावे व विद्यार्थ्यांचा फोटो, विद्यार्थ्यांची सही व पालकाची सही प्रवेश अर्जासोबत अपलोड करावे.
सर्व मुख्याध्यापकांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी करुन सदर निवड चाचणीसाठी विद्यार्थ्यांना प्रविष्ट करावे. नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशासाठी पात्र ठरण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे, जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.