बंगळुरू वृत्तसंस्था । कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील दगडाच्या खाणींमध्ये जिलेटीनच्या कांड्या घेऊन जाणार्या ट्रकमध्ये झालेल्या स्फोटात आठ मजुरांचा मृत्यू झाला असून मृतकांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवमोगा जिल्ह्यातील उनासेंडी येथील दगडी खाणींमध्ये एक ट्रक जिलेटीनच्या कांड्या घेऊन चाललेला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास या ट्रकमध्ये अचानक स्फोट झाला. यामुळे यात बसलेल्या आठ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
या स्फोटात झालेला आवाज इतका मोठा होता की, तो तब्बल २० किलोमीटर दूरवर ऐकू गेला. दरम्यान, या ट्रकमध्ये अजून काही लोक बसलेले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.