
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रातील मोदी सरकारने मे 2014 ते मार्च 2019 दरम्यान जाहिरातींवर तब्बल 5 हजार 700 कोटी रुपये खर्च केले आहेत. केल्याचे माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये इंग्रजी वृत्तपत्रांच्या तुलनेत हिंदी वृत्तपत्रांवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केल्याचे समोर आले आहे. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सरकारी जाहिरातींसाठी मोदी सरकारने 719 कोटी रुपयांहून अधिक पैसे खर्च केलेत, तर हिंदी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींसाठी 890 कोटींहून अधिक पैसे मोजल्याचे समोर आले आहे. या माहिती अधिकारानुसार ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला सर्वाधिक 217 कोटी रुपयांहून अधिकच्या सरकारी मिळाल्या आहेत.