यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर पतपेढीच्या अध्यक्षपदी किरण झांबरे यांची व उपाध्यक्षपदी शारदा चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकार्यांची सर्वानुमते बिन विरोध निवड करण्यात आली आहे.

यावल तालुका माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीची निवडणुक नुकतीच पार पडली असुन, या तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतपेठीच्या अध्यक्षपदाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांची निवडीची बैठक दिनांक २२ जुलै रोजी निवडणूक निर्णय अधिकारी के.व्ही.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत पतपेढीच्या अध्यक्षपदी किरण वासुदेव झांबरे, उपाध्यक्ष शारदा सुधीर चौधरी यांची; सचिवपदी आतिश शामराव मेघे व खजिनदार राजेंद्र भास्कर बर्हाटे यांचे प्रत्येक पदासाठी यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने सर्वांना बिनविरोध म्हणून निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले.

याआधी पार पडलेल्या निवडणुकीत जळगाव शिक्षक व शिक्षकेतर पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वाघुळदे यांच्या मार्गदर्शनात सहकार गटाची एकहाती विजय मिळवले होते व गटाचे सर्व उमेदवार विजयी होते. या पतपेढीत सहकार गटांनी आपले निर्विवाद वर्चस मिळवीले असून, अध्यक्षपदी दत्त हायस्कूल चिखलीचे किरण वासुदेव झांबरे व उपाध्यक्षपदी श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चुंचाळे येथील शिक्षिका शारदा सुधीर चौधरी यांची व सचिवपदी माध्यमिक विद्यालयाची आतिश मेघे, खजिनदारपदी लोक विद्यालय पाडळशाचे राजेंद्र बर्हाटे या सर्व पदाधिकार्यांची निवडणूक निर्णय अधिकारी के.व्ही.पाटील यांनी बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली.
या निवडीसाठी जळगाव शिक्षक शिक्षकेतर पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक सिद्धेश्वर वाघुळदे, डी. ए. पाटील, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी, मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी, मुख्याध्यापक ललित फिरके, भुसावल पतपेढीची चेतन तळेले, दीपक पाटील समाधान भोई, सुधीर चौधरी, अजित पाटील,मनोज फालक, कैलास चौधरी सोपान महाजन, ललित सुपे, किशोर चौधरी, नितीन झांबरे, डी.पी.बोरोले यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊन प्रक्रिया शांततेत पार पाडली.


