विचार वारसा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील मेहरुण येथे रामेश्वर कॉलनीतील विचार वारसा फाउंडेशन गणेश मंडळाची बैठक नुकतीच संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत अध्यक्षस्थानी एकमताने आशिष राजपूत यांची तर सचिव पदी अभिजीत राजपूत यांची निवड करण्यात आली.

या वर्षीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करण्याचे ठरले असून नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच गणेशोत्सवाच्या दहा दिवसात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे प्राथमिक नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर यंदा अभिनव असा देखावा उभारण्यात येणार असून त्याबाबतची नियोजन करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांची ७ सदस्य समिती स्थापन करण्यात आली.

मंडळाच्या अध्यक्षपदी आशिष राजपूत, उपाध्यक्ष मयूर डांगे, सचिव-अभिजीत राजपूत, कार्याध्यक्ष अमोल ढाकणे, दीपक सनसे, खजिनदार अजय मांडोळे, मंगेश मांडोळे, सदस्य- संकेत मस्कर, गौरव डांगे, आकाश राजपूत, राहुल पाटील, ऋषी राजपूत, मनीष चौधरी, आकाश तोमर,अक्षय गवई, लोकेश निकम,सोपान जाधव,चेतन राजपूत, दिपक तायडे,हर्षल बराटे,यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सदस्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

 

Protected Content