सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्हाईस ऑफ मीडियाच्या रावेर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या उपस्थिती नवनियुक्तांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
व्हाईस ऑफ मीडियाच्या रावेर तालुकाध्यक्षपदी अनमोदर्शी तायडे सर, तर कार्याध्यक्षपदी सावदा येथील सकाळचे जेष्ठ पत्रकार प्रवीण पाटील यांची संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सर, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, कार्याध्यक्ष योगेश दोरकर, विभागीय अध्यक्ष श्री महाले यांच्या अनुमतीने जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री मिलिंद टोके यांनी सर्वानुमते या दोघांची निवड केली आहे. संस्थेचे ध्येय व धोरणे सर्वसामान्य पत्रकारांपर्यंत पोहोचून पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा अशा अपेक्षा दोघांकडूनही वरिष्ठांनी व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक सतपंथरत्न श्री महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते दोघं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. यावेळी सावदा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्याम पाटील, यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.