लाडशाखीय वाणी समाज मंडळाची कार्यकारिणी जाहीर

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा येथील लाडशाखीय वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष किरण पुंजु वाणी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा होऊन पुढील कार्यकाळासाठी अध्यक्षपदी विजय नावरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन समाज मंडळाने आजपर्यंत राबवित असलेल्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक अशी कार्य व कार्यक्रम हे भाविष्यात देखील राबवावित असे समाज अध्यक्ष किरण वाणी यांनी सांगितले.

नुतन अध्यक्ष नावरकर यांनी बोलतांना सांगितले की, समाज बांधव भगिंनी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवित माझी निवड केली. त्याप्रमाणे मी आज पर्यंत जे कार्यक्रम होत आली ते होतीलच व भविष्यात अधिकाधिक चांगले उपक्रम राबवले जातील. त्यासाठी सर्वांची साथ हवी असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे पुढील कार्यकाळासाठी अध्यक्षपदी विजय दत्तात्रय नावरकर , उपाध्यक्ष हेमंकात रामभाऊ वाणी , सचिव महेंद्र गजानन कोतकर , खजिनदार भुषण प्रकाश टिपरे , संचालकपदी किरण पुंजु वाणी ,रविंद्र वामन शेंडे ,शरद नारायण मेखे सर,राजेंद्र नामदेव पाखले ,दिपक मधुकर पिंगळे, देविदास नामदेव वाणी , कुशल सुभाष शिरोळे , नितीन पुरुषोत्तम शिनकर , प्रशांत मधुकर येवले यांची सर्वांनुमते निवड करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Protected Content