तरूणींच्या दहीहंडी महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या प्रायोजनाने युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे मागील 15 वर्षांपासून जळगाव शहरात तरुणींचा दहीहंडी महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये सुमारे 15 ते 20 हजार जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित असतात. विशेष करून महिला वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय असते. यावर्षीसुद्धा मंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे सायंकाळी 6.30 ते रात्री 9.00 वाजे दरम्यान तरुणींचा दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण हे मुलींचे गोविंदा पथक राहणार आहेत. उत्तर महाराष्ट्र परिसरात या एकमेव दहीहंडी उत्सवात विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या माध्यमाने तयार करण्यात आलेल्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान दिला जातो. दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात महिलांचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आयोजक प्रयत्नशील असतात.

तरूणींच्या दहीहंडी महोत्सवाची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अनिल जोशी, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, पियुष हसवाल, राजेश नाईक आदी उपस्थित होते. यामध्ये तरूणींची दहीहंडी उत्सवाची कार्यकारीणी सर्वानुमते ठरविण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी प्रितम शिंदे, उपाध्यक्ष-संदीप सूर्यवंशी, सचिवपदी प्रशांत वाणी, सहसचिव-पवन चव्हाण, खजिनदार-पियुष हसवाल, सहखजिनदार सागर सोनवणे, भटू अग्रवाल, सोशल मिडीया समन्वयक शुभम पुश्चा, सुरक्षा प्रमुख पियुष तिवारी, सदस्य- आयुष कस्तुरे, रोहीत भामरे, राहूल चव्हाण, भवानी अग्रवाल, दिपक धनजे, दर्शन भावसार, दिक्षांत जाधव, नवल गोपाल, पंकज सुराणा, तेजस जोशी, तेजस दुसाने, सौरभ कुळकर्णी, शिवम महाजन, अल्फैज पटेल, तृशांत तिवारी, गोकुळ बारी, अर्जुन भारूळे, समिर कावडीया, सैफ मनसुरी, विपीन कावडीया, अजय खैरनार, हितेश पाटील, रोहीत सोनार, धनराज धुमाळ, कन्हैय्या सोनार, यश श्रीश्रीमाळ, गणेश भोई, श्रेयस मुथा, मनजीत जांगीड, विनोद सैनी, इत्यादी.

Protected Content