यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील मनवेल येथील पतीने आपल्या पत्नीच्या मानेवर विळ्याने वार करून खून केल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली असून संशयित आरोपीपती स्वत:हून यावल पोलीसात हजर झाला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी साडेचार वाजेचा सुमारास सिद्धार्थ नगरमध्ये जगन बुधो भालेराव यांने आपली पत्नी सूनंदा जगन भालेराव (वय ६०) यांच्या मानेवर विळ्यांने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनंदाबाई या जागीच गतप्राण झालेल्या होत्या. हत्या केल्याबरोबर आरोपी जगन भालेराव हा घटनास्थळावरून फरार झाला. घराच्या मागील खोलीत सुनबाई बसलेली होती. त्यामुळे समोरच्या घरात पती – पत्नीचे काय झाले? याची कुणालाही कल्पना आला नाही. थोड्या वेळाने सुनंदाबाईंना रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसताच सुनबाई चिकाटी मारुन बाहेर पडत आरडा-ओरडा करायला लागली. थोड्याच वेळात घटनास्थळी वाड्यातील ग्रामस्थ जमा झाले. दरम्यान, खुनाचे कारण अद्याप समजून आलेले नाही.
आरोपी जगन भालेराव हा दुपारी कामावरून घरी आल्यावर अचानक रागाच्या भरात पत्नी सुनंदा भालेरावच्या मानेवर विळ्यांने सपासप वार करुन फरार झाला होता. पत्नीवर हल्ला करून फरार असलेल्या आरोपी जगन भालेराव हा स्वत: यावल पोलीस स्टेशनला हजर झाला आहे. मयताच्या पश्चात पती, दोन मुल, एक मुलगी, सुन असा परीवार आहे. घटनेची माहीती येथील पोलीस पाटील सुरेश भालेराव यांनी यावल पो.स्टे.ला कळविले. फैजपुर येथील येथील विभागीय पोलीस अधिकारी नरेद्र पिंगळे, यावल पोलिस स्टेशनचे सपोनि सुनिता कोळपकर, सपोनि सुजीत, ठाकरे साकळी, पोहेकॉ अशोक जावरे, संजय तायडे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पोलीस तळ ढोकुन आहे. यावल ग्रामीण रुग्णांलयात शवविच्छेदन करण्यात येवुन उशीरापर्यंत यायल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.