एक्सक्लुझीव : जळगाव, रावेर मतदारसंघात मतांची आकडेवारी जुळेना

jalgaon raver voting mismatch

 

जळगाव : विजय वाघमारे

 

जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात झालेले मतदान आणि मतमोजणीच्या आकडेवारीत तफावत असल्याची धक्कादायक माहिती ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने केलेल्या पडताळणीत समोर आली आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान आणि मतमोजणीची पाठवलेली आकडेवारी एकमेकाशी जुळत नाहीय. एवढेच नव्हे तर निवडणूक आयोगाचे अधिकृत मोबाईल अॅप ‘वोटर टर्न आऊट’ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी विधानसभा निहाय पाठवलेल्या आकडेवारीत देखील मोठी तफावत आहे. त्यामुळे नेमकी कुठली आकडेवारी बरोबर? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

 

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मतदानाच्या वेळी झालेले मतदान आणि मतमोजणीची आकडेवारीमधील तफावत बाबत ३१ मे रोजी ‘द क्विन्ट’ या प्रसिद्ध वेबसाईटने एक वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तात देशातील ३७४ लोकसभा मतदार संघाची आकडेवारी जुळत नसल्याचे पुराव्या सकट प्रसिद्ध केल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने केलेल्या पडताळणीतही जळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीत फरक दिसून येतोय. म्हणजेच मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यांमध्ये फरक आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी झालेले मतदान आणि मतमोजणीच्या प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत -367 मतांची तफावत आहे. दुसरीकडे रावेर लोकसभा मतदार संघात देखील जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी झालेले मतदान आणि मतमोजणीच्या जाहीर केलेल्या आकडेवारीत -3 मतांची तफावत आहे.

 

एवढेच नव्हे, तर विधानसभा निहाय जाहीर केलेली आकडेवारीत देखील जळगावमध्ये 367 मतांचा फरक कायम आहे. तर रावेरमध्ये देखील ३ मतांची तफावत दिसत आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी २४ एप्रिल नंतर मतदानाच्या आकडेवारीत कोणताही बदल केला नाहीय. त्यामुळे जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून आलेला २४ एप्रिलचा ई-मेलमध्ये अंतिम आकडेवारी असल्याचेच स्पष्ट आहे. त्याच प्रकारे मतमोजणीसंदर्भात मात्र, 23 मे रोजी प्रसिद्ध केलेली मतदार संघ फेरी निहाय आकडेवारीतील आकडेमोड अधिकची तफावत दर्शवितात.त्यानुसार अंतिम मतमोजणीचा आकडा हा 10,84,846 असा असून आधी जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार -3,788 मतांची तफावत दिसून येतेय. तर रावेर मतदार संघात सुधारित फेरी निहाय आकडेवारीत -78 मतांची तफावत आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघ

6dd99556 cfb0 4c4b 9cb2 891d13a738a3

   

3d5cd296 eaf6 4d01 8820 991d5731b6b0

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ईव्हीएमने झालेले मतदान 10,80,576 एवढे. तर पोस्टल मतदान 7,701 आणि एकूण मतदान 10,88,277 एवढे दाखविण्यात आले आहे. तर दुसरीकडे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी 23 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर 24 एप्रिलच्या सायंकाळी म्हणजेच मतदान झाल्याच्या तब्बल 24 तासानंतर सर्व माध्यमांना पाठविलेले ई-मेल आणि सोशल मिडियात टाकलेल्या आकडेवारी नुसार जळगाव लोकसभा मतदार संघात पुरुष मतदार 10,08,818, स्त्री मतदार 9,16,470, इतर मतदार 64 असे एकूण मतदार 19,25,352 एवढे आहेत. तर मतदान केलेले मतदार पुरुष 5,84,465 व स्त्री 4,95,815, इतर 13 असे एकूण मतदान केलेले मतदार 10,80,293 एवढे होते. तर पुरुष 57.94 टक्के, स्त्री 54.10 टक्के, इतर 20.31 टक्के असे एकूण 56.11 टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.

 

1 2

 

दरम्यान, यात भडगाव येथील एका मतदान केंद्रावर 29 एप्रिल रोजी फेरमतदान होणार असल्यामुळे तेथील आकडेवारी यात समाविष्ट नव्हती. 29 एप्रिल रोजी पाचोरा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 107 भडगाव येथे 48.44 टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली होती. यानुसार या मतदान केंद्रांतर्गत पुरुष मतदार 690, स्त्री मतदार 652 असे एकूण 1342 मतदार होते. यापैकी 354 पुरुष मतदार, 296 स्त्री मतदार असे एकूण 650 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानुसार 24 एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या 10,80,293 या मतांमध्ये भडगाव येथील झालेले फेरमतदान 650 आणि 7,701 या पोस्टल मतदानाची बेरीज केली असता 10,88,644 एवढी होते. परंतू निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एकूण मतदान 10,88,277 एवढे दाखवले जात आहे. यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या आकडेवारी पेक्षा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर -367 मतांचा घोळ आहे. तर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणीची पाठवलेल्या आकडेवारीनुसार जळगाव लोकसभा मतदार संघासाठी झालेले मतदान आणि मतमोजणीत देखील तफावत आहे. तर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मतदार संघ निहाय प्रसिद्ध सुधारित आकडेवारीत एकूण मतदान 10,84,846 इतके एकूण मतमोजणी झाल्याचे सांगण्यात आलेय. यानुसार मतदान आणि मतमोजणीत 3,431 मतांचा फरक आढळून येतोय.

jalgaon antim feri

 

 

विधानसभा निहाय आकडेवारीत देखील घोळ

3 1

 

जळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी 24 एप्रिल रोजी जाहीर केलल्या जळगाव लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघ निहाय आकडेवारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकृत मोबाईल अॅप्लिकेशन ‘वोटर टर्नआऊट’वर प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत देखील विसंगती आढळून येतेय. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार जळगाव शहर विधानसभा मतदार संघ (1,92,302), जळगाव ग्रामीण (1,90,075) अमळनेर विधानसभा (1,56,243), एरंडोल विधानसभा (1,65,477), चाळीसगाव विधानसभा (19,75,56),पाचोरा विधानसभा (1,78,640 + 650) (भडगाव फेरमतदान), असे एकूण 1,79,290 एवढे मतदान झाल्याचे जाहीर केले होते.

0629b5a5 fb81 4408 8e5d bc4dba514cfe

 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मात्र, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतांचा कमी-अधिकचा घोळ दिसून येतोय. जळगाव शहर विधानसभा मतदार संघ (1,92,297), जळगाव ग्रामीण (1,90,074) अमळनेर विधानसभा (1,56,242), एरंडोल विधानसभा (1,65,673), चाळीसगाव विधानसभा (197555), पाचोरा विधानसभा (1,78,735) एवढे मतदान झाल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार जळगाव शहर विधानसभा मतदार संघात -5 मतं, जळगाव ग्रामीण, अमळनेर, चाळीसगावमध्ये प्रत्येकी -1 मत, तर एरंडोल विधानसभा संघात +196 तर पाचोरा विधानसभा मतदार संघात -555 मतांचा फरक आहे. असे एकूण -367 मतं केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकृत मोबाईल अॅप ‘वोटर टर्न आऊट’वर दिसताय. संपूर्ण जळगाव लोकसभा मतदार संघात -367 तर विधानसभा निहाय आकडेवारीत देखील -367 मतांचा घोळ कायम आहे.

 

रावेर लोकसभा मतदार संघ

raver final

 

1f7596f5 0e26 4494 a734 5574698a8ae1

 

जळगाव लोकसभा मतदार संघाप्रमाणे रावेर लोकसभा मतदार संघात देखील आकडेवारीचा घोळ असल्याचे समोर आले आहे. ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने केलेल्या पडताळणीत जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेली आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत -३ मतांचा फरक आढळून येतोय.

jalgaon raver matdan 2

 

रावेर लोकसभा मतदार संघात निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर इव्हीएमने झालेले मतदान 10,88,693 तर 4,278 मतदान पोस्टलने आलेले असून एकूण मतदान 10,92,971 एवढे झाल्याचे प्रसिद्ध केले आहे. तर दुसरीकडे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी 23 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर 24 एप्रिलच्या सायंकाळी 5:30 वाजता म्हणजेच मतदान झाल्याच्या तब्बल २४ तासानंतर सर्व माध्यमांना पाठविलेले ई-मेल आणि सोशल मिडियात टाकलेल्या आकडेवारी नुसार रावेर लोकसभा मतदार संघात मतदार पुरुष 9,23,627, स्त्री 8,49,451, इतर 29, एकूण मतदान 17,73,107 एवढे आहे. तर मतदान केलेले मतदार पुरुष 5,83,427, स्त्री 5,05,262, इतर 1 असे होते. यानुसार एकूण मतदान 10,88,690 एवढे झालेले आहे. यात 4,278 पोस्टल मतदान जोडले तर हा आकडा 10,92,968 एवढा होतो. तर मतदानाची टक्केवारी पुरुष 63.17 टक्के, स्त्री 59.48 टक्के, इतर 3.45 टक्के अशी एकूण 61.40 टक्के आहे. या दोन्ही आकडेवारींवर नजर टाकली असता -३ मतांचा फरक आढळून येतो. एवढेच नव्हे तर फेरीनिहाय सुधारित आकडेवारीच्या पाठवलेल्या ‘ई-मेल’ नुसार रावेर मतदार संघात अंतिम आकडेवारी 10,93,046 इतकी सांगण्यात आलीय. तर विजयी उमेदवार जाहीर करतांना हाच आकडा 10,92,971 एवढा दाखविण्यात आला आहे. यानुसार -75 मतांचा फरक आहे.

raver antim feri

 

विधानसभा मतदार संघनिहाय आकडेवारीतही तफावत

4 1

 

जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतदानाची जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चोपडा विधानसभा मतदार (1,88,340), रावेर विधानसभा (1,95,572), भुसावळ विधानसभा (1,58,884), जामनेर विधानसभा (1,84,514), मुक्ताईनगर विधानसभा (1,82,486) तर मलकापूर विधानसभा मतदार संघात (1,78,894) एवढे मतदान झाल्याचे म्हटले होते.

 

दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकृत मोबाईल अॅप्लिकेशन ‘वोटर टर्नआऊट’वर मात्र, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतांची तफावत दिसून येतेय. यानुसार चोपडा विधानसभा (1,88,360), रावेर विधानसभा (1,95,571), भुसावळ विधानसभा (1,58,882), जामनेर विधानसभा (1,84,508) मुक्ताईनगर विधानसभा (1,82,480) तर मलकापूर विधानसभा मतदार संघात (1,78,892) एवढे मतदान झाल्याचे दाखवताय. यानुसार चोपड्यात +20, रावेर -1,भुसावळ -2, जामनेर, मुक्ताईनगर प्रत्येकी -6 तर मलकापूर विधानसभा मतदार संघात -2 मतांचा फरक दिसून येतोय. यानुसार विधानसभा मतदारसंघ निहाय देखील -3 मतांची तफावत कायम आहे. त्याच प्रकारे मतमोजणीसंदर्भात 23 मे रोजी प्रसिद्ध केलेली मतदार संघ फेरी निहाय सुधारित आकडेवारी अधिकची तफावत दर्शवितात. त्यानुसार अंतिम मतमोजणीचा आकडा हा 10,92,986 असा असून आधी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार -60 मतांची तफावत होतेय.

f5018794 8e9e 497e bacd 2a4e4cae3c64

 

सूचना : 24 एप्रिल आणि 24 मे नंतर जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आकडेवारीत काही बदल केलेले असू शकतात. परंतू माध्यमांना त्याबाबत अधिकृत माहिती न दिल्यामुळे तूर्त हीच आकडेवारी गृहीत धरून हा वृत्तांत प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Protected Content