फैजपूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात

फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर नगरपरिषदेत 9 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपालिका सभागृहात नगराध्यक्षा महानंदा होले यांच्या हस्ते आदिवासी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

दरम्यान, ‘आमची संस्कृती, आमचा अभिमान’.., ‘मी आदिवासी, माझा स्वाभिमान’ अशी परंपरा असलेली आदिवासी कला सातासमुद्रापार पोहोचली. आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली आहे. रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात आहे. 

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा महानंदा होले(टेकाम), भा.ज.पा. गटनेते मिलिंद वाघूळदे, कलिम खा मण्यार काँग्रेस गट नेते, विद्यमान नगरसेवक प्रभाकर सपकाळे, रशिद तडवी, फिरोज तडवी, चंद्रशेखर चौधरी, भा.ज.प. शहराध्यक्ष रशीद तडवी, वसीम तडवी, असरफ तडवी, सामाजिक कारकर्ते रवींद्र होले, राजू तडवी, हसन तडवी, रावते गुरुजी, आसेम अध्यक्ष राजू तडवी आदिवासी बांधव उपस्थित होते.

 

Protected Content