खळबळजनक ! स्वस्त धान्य दुकानात आढळले प्लास्टिकचे तांदुळ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील विविध स्वस्त धान्य दुकानातुन शिधा पत्रीका धारकांना पुरवठा यंत्रणेकडून वितरीत करण्यात येत असलेल्या प्लास्टिकचे तांदुळ भेसळ वितरीत करण्यात येत असल्याची ओरड धान्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांना कडून करण्यात येत आहे. या तांदूळात प्लास्टिकचे तांदूळ भेसळ केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत आपण चौकशी करू असे तहसीलदार यांनी पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना सांगितले.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की यावल तालुक्यात शासनाव्दारे संचलीत १२४ अशी स्वस्त धान्य वितरण करणारी दुकाने असुन या स्वस्त धान्य दुकानातुन प्रतिमाह१० हजार७२६ अंत्योदय आणी ३२ हजार ९७४ अशी एकुण ४३ हजार ७०० शे अशा विविध ठिकाणाहून गोरगरीब व गरजू शिधा पत्रिका धारकांना धान्य क्विंटल धान्य वितरण करण्यात येत असते. या वेळीस वितरीत करण्यात आलेल्या तांदुळात प्लास्टिकचे बनावट तांदुळ भेसळ केलेले आढळून येत आहे.

दरम्यान हे तांदुळ खाल्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत नागरीकांना होण्याची शक्यता असुन शासनाकडून मोफत धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यास व त्यांच्या कुटुंबास या प्लास्टिक तांदुळामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसून या विषयाला घेवुन पत्रकारांशी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांची भेट घेवुन या प्लास्टिक तांदुळा बद्दल माहिती त्यांना दिली, सदर प्लास्टिकचे तांदुळ भेसळ केलेले तांदुळ गोंदीया या ठिकाणाहुन राज्यातील विविध धान्य दुकात वितरणासाठी येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यावेळी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी आपण या संदर्भात प्रत्यक्ष धान्य गोदामावर जाऊन वितरणासाठी आलेल्या तांदुळाची तपासणी करणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलतांना दिली .

Protected Content