जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुरभि बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे नुकताच नवसाचा गणपती मंदीर हॉल येथे “संक्रांत हळदीकुंकू “कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस मंडळाच्या अध्यक्षा सौ स्वाती कुलकर्णी, रेवती शेंदुर्णीकर मंजुषा राव, विनया भावे ह्याच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक स्वाती कुळकर्णी ह्यांनी केले. नंतर सहकार भारती राष्ट्रीय महिला प्रमुख निवड झाल्याबद्दल सौ. रेवती शेंदुर्णीकर ह्यांचा सत्कार अध्यक्षा सौ स्वाती कुळकर्णी ह्यांच्या हस्ते करण्यात आला. ह्या प्रसंगी त्यांनी आपले मत तसेच त्यांचे नर्मदा परीक्रमा आणि श्री क्षेत्र गिरनार येथील प्रवास वर्णन कथन केले. कार्यक्रमात नविन सभाससदांचा सत्कार तसेच “उत्कृष्ठ सुरभि सभासद पुरस्कार “सौ. तनुजा पाठक ह्यांना देण्यात आला. त्या नंतर सभासदांना वाण देऊन हळदीकुंकू दिले.उत्कृष्ठ सुरभि सभासद पुरस्कार प्राप्त झालेल्या सौ तनुजा पाठक ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ह्या वेळी सभासद चारुलता जोशी, आशा जोशी, साक्षी साखरे, पौर्णिमा कुळकर्णी,स्मिता शुक्ल,स्नेहल कुळकर्णी, मिताली राजहंस,ह्यांनी स्वरचित उखाणे सादर केले.व कविताही सादर केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन वैदेही नाखरे ह्यांनी केले. कार्यक्रमासाठी साधना दामले, वैशाली कुलकर्णी, अश्विनी चं. जोशी, मेघा नाईक, सुनीता सातपुते, अश्विनी अ. जोशी, सविता नाईक, नीलिमा नाईक,संजीवनी नांदेडकर, माधुरीताई फडके, डॉ वैजयंती पाध्ये आदींनी सहकार्य केले. शासनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला.