पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील भातखंडे बुद्रुक येथे पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोगनिदान तपासणी शिबिर तसेच मोफत औषधी वाटप करण्यात आले.
सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्नील पाटील यांनी भव्य रोग निदान शिबिर घेऊन नागरिकांची तपासणी केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे माजी चेअरमन पंडित पाटील होते. डॉ. स्वप्निल पाटील यांचा सत्कार अतुल महाजन यांनी केला.
सरपंच भागाबाई प्रकाश भिल, माजी सरपंच अतुल महाजन, सदस्य संदिप पाटील, नितीन पाटील, राहूल पाटील, ग्रामसेवक चंद्रकांत सोमवंशी, पत्रकार संजय पाटील, डॉ. भरत पाटील, डॉ. संजय समदाणी, मनोज पाटील, मुख्याध्यापक एस.आर. पाटील, बी.एन. पाटील, राहुल पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष पितांबर पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. परिसरातील नागरिकांसाठी सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने आयोजित केलेल्या ह्या भव्य अशा आरोग्य शिबिरा बद्दल ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांनी डॉ. स्वप्निल पाटील यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हॉस्पिटलचे कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी संदीप पाटील, योगेश पाटील, वाटरमन रमेश बागुल, सोपान पाटील यांनी परिक्षम घेतले.