महायुतीत खळबळ; भाजपचा मोठा नेता अपक्ष लढविणार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे जिल्ह्यात इंदापूर विधानसभा मतदार संघ आहे. या मतदार संघात भाजप नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मोठी ताकद आहे. पण मागिल दोन निवडणुकांत त्यांना पराभव सहन करावा लागला आहे. इथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्ता भरणे हे सध्या आमदार आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला सुटणे अवघड आहे. अशा स्थितीत हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष लढण्याचे हत्यार उपसल आहे. बावडा गावात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची शाखाच स्थापन केली आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी अजित पवार जागा सोडणार नाहीत हे जवळपास निश्चित आहे. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे एकमेकांचे पिढ्यानपिढ्याचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. १९९५, १९९९ आणि २००४ या तीन निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढविल्या. त्या त्यांनी जिंकल्यात ही होत्या.अजित पवारांच्या त्रासाला कंटाळूनचं हर्षवर्धन पाटलांनी २०१९ ला काँग्रेस सोडली होती. पण तेच अजित पवार आता हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय प्रवासात अडसर ठरतील अशी स्थिती आहे. ही जागा महायुतीत अजित पवार सोडणार नाहीत त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत.

Protected Content