सुकी नदी पात्रात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील पाल येथील सुकी नदी पात्रात  मध्यप्रदेशातील मुळ रहिवाशी असलेल्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच  खळबळ उडाली आहे. याबाबत वृत्त असे की  पाल येथील वन प्रशिक्षण केंद्राच्या खाली नदी पात्रात पाल गावाकडे जाणाऱ्या कच्चा रोडच्या बाजूला सुरेश सुमऱ्या  बारेला (वय २५) या तरुणाचा मृतदेह आढळून आला.त्याच्या गळा मानेवर गळफासचे निशाण आहे.

हा तरुण मध्यप्रदेशातील कलोरी ता. जि. खंडवा येथील मुळ रहिवाशी आहे. मात्र कामानिमित्त हल्ली मुक्काम दापुरे ता. एरंडोल येथे आहे. त्याचा मृत्यू दि. २५ मार्चचे सकाळी १२ ते दि. २६ मार्चच्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान झाला त्याच्या गळा मानेवर गळफासचे  निशाण असल्याचे पोलीसांनी सांगितले. याबाबत चिंपी सुरेश बारेला यांनी माहिती दिल्याने रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  सुरेश बारेला मृतदेह संशयास्पद स्थितीत  मिळुन आल्याने उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील यांनी धाव घेतली. घटनास्थळी भेट देऊन जयस्वाल यांनी पोलीसांना तपास कामाबाबत सुचना दिल्या. पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला. दरम्यान मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रावेर ग्रामीण पाठविण्यात आला. डॉ. वैभव गिरी यांनी पोस्टमॉर्टेम केले. पोस्टमॉर्टेमचा अहवाल आल्यानंतर सुरेशचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत कारण स्पष्ट होईल.

Protected Content