भुसावळात मृतदेह आढळल्याने खळबळ !

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील आठवडे बाजार येथील नगरपालिकेच्या सुलभ शौचालयाच्या बाजूला एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकनाथ देवकाम पवार वय-४५, रा. बलवाडी ता. रावेर असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील बलवाडी येथे एकनाथ पवार हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. गुरुवार 12 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आठवडे बाजार परिसरामधील नगरपालिकेच्या सुलभ शौचालयाच्या बाजूला त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आला. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content