रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात नजीक एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात अनोळखी इसमाबाबत काही माहिती मिळाल्यास रावेर पोलीस पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन रावेर पोलिस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.
या बाबत वृत्त असे की, गुरूवार १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उटखेडा रोडवरील क्रीडा संकुल परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. या व्यक्तीचे वर्णनमध्ये उंची: अंदाजे 5 फूट 1 इंच, रंग: सावळा, वय: अंदाजे २५ ते २८ वर्षे, कमरेत: काळ्या रंगाचा करदोडा अंगात: काळ्या रंगाचे फुल बायांचे टी-शर्ट तसेच नीळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, हिरव्या रंगाची निकर, उजव्या हातात: काळा पट्टा असलेले घड्याळ,डाव्या हातात: स्टीलचे कळे असुन वरील वर्णाचा कोणी गायब असल्यास रावेर पोलीस स्टेशन येथील दूरध्वनी क्रमांक 02584-250333 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.