रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील वाघोड येथील शाळा खूप सुंदर आहे. आताच्या काळात जिल्हा परिषदच्या शाळा अत्यंत दयनीय झाल्या असून अशा शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. पुढे देखील असे उपक्रम राबवले जावेत, असे प्रतिपादन धनंजय चौधरी यांनी केले.
रावेर शहरातील कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये महाराष्ट्र शासन अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या शिक्षण विभाग, पंचायत समिती रावेरमार्फत पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, १९ जुलै रोजी संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदच्या सुलवाडी शाळेला प्रथम क्रमांक ३ लाख रुपये व पारितोषिक मिळाले. वाघोड द्वितीय क्रमांक शाळेला २ लाख रुपये व पारितोषिक मिळाले. कुसूंबा शाळेला तृतीय क्रमांक १ लाख रुपये व पारितोषिक मिळाले. खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पी. एम. नेमाडे सावदा प्रथम क्रमांकासाठी ३ लाख रुपये, प्रकाश विद्यालय मोठे वाघोदे द्वितीय क्रमांकासाठी २ लाख रुपये, आणि अ.भा.पाटील खिर्डी तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपये मिळाले. यावेळी १४ दिव्यांग मुलांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.
समारंभात मुख्याध्यापिका पुराणिक मॅडम, गट शिक्षण अधिकारी शैलेश दखने, विस्तार अधिकारी विलास कोळी, केंद्र प्रमुख रईस शेख, नाना पाटील, गणेश धांडे, दिलीप पाटील, हरीश बोंडे, दिपक मराठे व सर्व शिक्षा अभियानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.