नवी दिल्ली – भारतीय रेल्वे सुमारे 1 लाख 40 हजार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. त्या भरतीसाठी संगणक आधारित परीक्षा 15 डिसेंबरपासून घेतल्या जाणार आहेत. त्याविषयीची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के.यादव यांनी दिली.
संबंधित पदांसाठी सुमारे 2 कोटी 42 लाख अर्ज करण्यात आले आहेत. करोना संकटामुळे भरतीसाठीच्या परीक्षा आतापर्यंत होऊ शकल्या नाहीत. ज्या पदांसाठी परीक्षा होणार आहेत त्यामध्ये गार्ड, ऑफिस क्लार्क, कमर्शियल क्लार्क आणि इतर बिगर तांत्रिक लोकप्रिय श्रेणीतील 35 हजार पदांचा समावेश आहे. रेल्वेकडून परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.